अजून खूप जगायचंय
अजून खूप जगायचंय
एवढं आयुष्य जगूनही अजून खूप जगायचं राहिलंय
तुझ्याशी खूप बोलूनही अजून खूप बोलायचं राहिलंय
आयुष्यभर काम करूनही अजून काही करायचं राहिलंय
मुलं मोठी झाली तरी त्यांच्याशी एकदा खेळायचं राहिलंय
अनेक पावसाळे पहिले तरी मनसोक्त भिजायचं राहिलंय
कित्येक सुट्ट्या येऊन गेल्यातरी पुन्हा झाडाखाली भेटायचं राहिलंय
घड्याळ मागे धावताना स्वतःसाठी थांबायचं राहिलंय
एवढं आयुष्य जगूनही अजून खूप जगायचं राहिलंय
