ऑनलाइन प्रेम
ऑनलाइन प्रेम


फेसबुकवरचा कोळी तो
टाकायचा रोज एक गळ
चांगलाच मासा लागावा
म्हणून लावायचा नेटबळ.
चमकदार मासोळ्या किती
चंचल भलत्याच करायच्या
हिरव्या दिवा दाखवून त्या
हसता हसता गायब व्हायच्या.
एके दिवशी एक मासोळी छान
बोलली अचानक हरवून भान
सगळे गळ दिले फेकून याने
एका मासोळीवर न्योछावर जान.
प्रेमभंगाची विसरून कहाणी
नव्या कोळ्याची झाली दिवानी
सगळं सगळं सांगून टाकले अन
गुरफटून गेली माया मोहांनी.
आभासी बोलणेही खूप झाले
भेटीलागी दोघे कासावीस झाले
भेटायचे एकमेकांना नक्की केले
दिवस आणि ठिकाण पक्के झाले.
गुलाबी भेटवस्तु घेऊन आतूर दोघे
एकाच बाकावर बसून "प्रेम" वाट बघे
कंटाळून एकमेकांना लावला फोन
शेजारीच ऐकू आली ती रिंगटोन.
पाहिले एकमेकांना आणि धक्का बसला
जाळ्यात मासा असाकसा हा फसला.
ती होती "चाळीशीची" हा होता "लुकडा"
उरल्यासुरल्या काळजाचा मोडला तुकडा.
प्रेम भेटे प्रेमळाला रीत जगाची खरी
आभासी प्रेमापेक्षा घरची लक्ष्मी बरी
जाळे टाकून खोटे होते फजिती बुरी
आपल्याच मानेवर..."नेट" की छुरी