सवय
सवय

1 min

422
बोलतो.."मस्त चाललंय आमचं "
स्वस्थ काही बसता येत नाही...
क्षण सुटलेल्या आयुष्यात आजही
सवय काही सहजासहजी सुटत नाही.
अलिप्ततावादी म्हणून मिरवतो जो तो
अलिप्त राहणे ही सवय दिसत नाही
स्वप्नांची यादी अपुरीच अन अधुरीही
स्वप्न पाहायची सवय तरी सुटत नाही.
सोबत कुणाची बनते सवय क्षणात
ध्यानातही नसते ते ते शिरते मनात
चार क्षणांचे सोहळे सरता मागे तेव्हा
सवयीचे गुलाम चटके सोसतात उन्हात.