लोभस
लोभस


आनंदाचा झरा गवसला होता
जगणेही होते निर्मळ प्रवाही
मोहात अडकलो नाही जरी मी
लोभस होते ते सर्वकाही.
मिळविण्या मनातले होतो श्रमलो
चिंता उद्याची फारशी केली नाही
तहान लागली जेव्हा इथेच शमलो
रमलो आप्तात परी गुंतलो नाही.
कालचा सुकाळ आता उरला कुठे
गती काळाची या उलघडत नाही
सर्वकाळ राहतील कशी तुपात बोटे
विरजण घालते कोण नाकळे काही