ते मैत्रीचे नाते
ते मैत्रीचे नाते
1 min
233
सांगितल्याविन
मन कळते
संकटसमयी
खरी तार जुळते
एका हाकेला
पाऊल वळते
...
मागून पाहा..,
इथे सारे मिळते
अनुपस्थिती ज्याची
काळीज जाळते
...
असो कसलेही विघ्न
लिलया टळते
जीव लावण्याची
जिथे किंमत कळते
नडलेच कुणी तर
त्याला पुरते छळते.
...
नाव तयाचे मैत्री
ते मैत्रीचे नाते.
येऊ देत कितीही दुरी
आजही शाबूत राहते.
