उमजू लागले जरासे
उमजू लागले जरासे
1 min
262
आता कुठे उमजू
लागले जरासे होते
इतके दिवस प्रवाही
कोरडे उसासे होते.
समजणे होते बाकी
अजून बरेच काही
नेत्र जाणीवेचे बहुधा
शोधात दिशेंच्या दाही.
जाणिवा नेणीवांनी
जेव्हा गुंफले हात हाती
समजून उमजायाची
पहिलीच पायरी होती.
तळ मनाचा लागाया
लागते खोल खोल जावे
जितके समजले तितके
लागते चाचपून पाहावे.
