मेसेजची वाट पाहताना
मेसेजची वाट पाहताना


तुझ्या मेसेजची वाट पाहताना
आजही हृदयात व्हायब्रेट होते
तुझं "हाय" पाहताच स्क्रिनवर
मन आनंदात सेलिब्रेट होते.
इवलीशी स्क्रिन भासतो पडदा
विरहाने काळजात दिड्दा दिड्दा
पापणीची लवलवही नसते इतकी
मोबाईलवर नजरेचा सुरु ताकतुंबा.
माणसांत असुनही नसतो माणसात
मनात विचारांची गुलाबी बरसात
एक पाय घरी अन चित्त नाही थारी
येरझऱ्या अगणित सुरु परसात.
आजही आला मेसेज अन आठवले सारे
जुने मेसेज परत वाचताना फुटले धुमारे
काय होती हवा आपली वेगळे होते सारे
मनमोराचे अजूनही फुलून येतात पिसारे.