उदास हळव्या रात्री
उदास हळव्या रात्री


खूप काही सांगून जातात
या उदास हळव्या रात्री
परतीच्या वाटसरु आठवणी
आसवांच्या गावच्या यात्री.
धुम्र वलये उठतात किती
विरतात किती उरतात किती
भिरभिरत नजर धोका खाती
तेल संपलेल्या फडफडती वाती.
निशेची विवंचना उजेडात नाही
शीतल प्रहर मग व्हावी का लाही
ओळखीच्या असूनही धूसर दाही
काळोखातही मन काय पाहत राही.?