तुझ्या मनासारखं
तुझ्या मनासारखं

1 min

222
जेव्हा जेव्हा मी ठरवतो
तुझ्या मनासारखं वागावं
तूच जाणतेस मनातलं अन्
मलाच लागतं पस्तावावं..
तुझं तसं चुकत नाही फारसं
वेडं मन शोधत बसतं चुका
थांगही लागत नाही मनाचा
तुझ्या., मीच खातो नित्य धोका.
तुझं चुकल्यावर काय करावं या
विचारात व्यर्थच सारी शक्ती
रुठलीसच तर शोधुन काढतोच
मनवायची मी नवनवी युक्ती.
तुला कळण्याआधी म्हणतो मी
तुझ्या मनासारखं एकदा वागावं
फक्त तुझ्या मनातलं वाचायचं गडे
एक तरी गुपित हाती माझ्या लागावं.