STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

घडल्या अनेक गोष्टी

घडल्या अनेक गोष्टी

1 min
278

घडल्या अनेक गोष्टी मज

आनंदाचीच तहान होती.

स्पर्शले ते ते झाले कांचन

लाभली ती वेळ छान होती.

निष्कांचन झोळी काखेला

पण सदा ताठच मान होती.

धुळ पावलांशी गुज करायची

तेव्हाही मातीची जाण होती.

हिरा शोधण्याचा हट्ट नव्हता जरी

काळोखी कोळशाची ती खाण होती.

उचललेल्या पावलांना बंदी माघारीची

एका काळजाची मला तशी आण होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational