शेती माती
शेती माती


।। शेती माती ।। ( अष्टाक्षरी )
काळ्या मातीत मातीत
बळी पिकवितो मोती
भिजे घामाच्या धारात
राब राबुनिया शेती ।।
टाके मातीत बियाणं
रुजे हृदयात खोल
लय उदार मनाचा
किती करु त्याचं मोल ।।
पाहे मातीत सपान
जोडी माती संगे नाळ
बरसरे मेघ राजा
नको आता हा दुष्काळ ।।
माझ्या देशाची रे माती
देई जगण्या आधार
दीन दुबळ्या बळीचा
सारा तिच्यावर भार ।।
फुले रंगी रे बेरंगी
शेती मातीचे ते बांध
शालू हिरवा नेसून
देई मनाला आनंद ।।