शिक्षण...
शिक्षण...
प्रथम प्रशिक्षित मुख्याध्यापिका...
साऊ तुमचा मान...
थोर क्रांतिकारक म्हणूनी...
साऊ... तुमचेच स्थान...।।
भिडे वाड्यात मुलींची...
पहिली शाळा सुरु झाली...
सावित्रींनीच स्त्री शिक्षणाची...
खऱ्या अर्थाने सुरुवात केली...।।
खडतर अशी तपश्चर्या...
करावीच लागली..
कैदाशिन, म्हारीण म्हणूनी...
लोकं सारी वागू लागली...।।
घाणेरडे पाणी अन् शेणगोळे...
सहन केले सारे...
असे फुले दाम्पत्य...
स्त्री शिक्षणाचे कवाडं उघडणारे...।।
नेत्रदिपक कामगिरी...
शिक्षणाच्या इतिहासात...
सुवर्णाक्षरांनी लिहुनी ठेवावी...
या ज्योतिबाच्या सावित्रीची...
किती गाणी गावी...।।
