STORYMIRROR

sarala deshmana

Others

4  

sarala deshmana

Others

सख्या

सख्या

1 min
303

धागा जीवनाचा गुंफतांना

तू मजला साथ दिली...

अशीच लग्नानंतरची माझी

सारी वर्षे आनंदात गेली...


आलीत बिकट प्रसंग

सख्या जीवन जगतांना

पण तू आधार दिलास

ही जीवनवाट चालतांना...


तळहाताच्या फोडाप्रमाणं

किती मला जपलंस  

कधी आले असेल दुःख

तर तूच ते टिपलंस...


सख्या माझ्या लेखणीला

नेहमीच बळ तू दिले

म्हणून माझे कृष्णमंजिरी

काव्यसंग्रह प्रकाशित झाले...


सख्या तुझी साथ मला

अशीच भक्कम राहिल

धागा जीवनाचा विणताना

पणतीत ज्योत जळत राहील..


Rate this content
Log in