माझी आई...
माझी आई...
1 min
387
आई माझी शिकली नाही
कधीही एक अक्षर
तिलाही वाटायाचे
व्हावे मी ही साक्षर।।
गरीबीमुळे जावे लागे
काम करायला आईमागे
इच्छा असूनही शिकण्याची
कधी बसे ती रागे रागे ।।
स्वतः जरी नाही शिकली
अक्षर एकही कधी
तरी मला बरोबर सांगते
कोणती तिथी असेल आधी।।
दिनदर्शिकेतील अक्षरे
वाचली नाही कधी
अमावस्या,पौर्णिमा
पाठच असतात आधी।।
मराठी महिना
अचूक सांगते
इंग्रजी महिना
समजत नाही म्हणते।।
शिकण्याची ईच्छा
मुला नातवात पाहते
स्वतः शिकण्याची ईच्छा
मात्र मनातच राहते...
मनातच राहते...
