STORYMIRROR

sarala deshmana

Others

3  

sarala deshmana

Others

अक्षरांगण...

अक्षरांगण...

1 min
8

अक्षरांगणातली होती सुंदर

माझी जिल्हापरिषद शाळा

शिकण्यासाठी शाळा

तिने लाविला मज लळा...


अक्षरांगणातली अक्षरे

सारी मज तिने शिकविली

जन्मभराची शिदोरी तिने

मज भेट स्वरूप दिली...


अक्षरांगणातील शाळेने

मज ज्ञानामृत पाजिले

या ज्ञानामृतानेच आज

मी विद्यार्थी घडविले...


अक्षरांगणात होते मज

जीव लावणारे गुरू

गुरुपौणिमेच्या निमित्ताने

आज त्यांनाही स्मरू...


अक्षरांगणात खेळले मी

अक्षरांगणात वाढले मी

 अक्षरांगणातल्या कवितेतचं

आज बालपणात हरवले मी...



Rate this content
Log in