STORYMIRROR

sarala deshmana

Tragedy Others

4  

sarala deshmana

Tragedy Others

आरोळी...

आरोळी...

1 min
411

सरीता आरोळी

देत होती मोठ्याने

आता तरी वाचव मानवा

भरले मी कचऱ्याने


वृक्ष आरोळी

देत होते मोठ्याने

आता तरी वाचव मानवा

जखम झाली कुऱ्हाडीने


मंदिर आरोळी

देत होते मोठ्याने

आता तरी वाचव मानवा

गुदमरलो मी निर्माल्याने


वसुंधरा आरोळी

देत होती मोठ्याने

आता तरी वाचव मानवा

श्वास गुदमरलाय प्रदुषणाने


सूर्य आरोळी

देत होता मोठ्याने

आता तरी वाचव मानवा

वसुंधरा आली धोक्यात

ओझोनच्या कमी थराने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy