STORYMIRROR

sarala deshmana

Others

3  

sarala deshmana

Others

गाववेस...

गाववेस...

1 min
159

माझ्या गावाच्या वेशीचा   

दरवाजा भारी नक्षीचा...

 माझ्या गावाच्या वेशीवर

 किलबिलाट पक्ष्यांचा...


माझ्या गावाच्या वेशीचे

लई भरभक्कम दरवाजे...

त्यावरी सुंदर हत्तीचे

चित्र छान साजे...


माझ्या गावाच्या वेशीला

पहारेकरी उभे दोन...

त्यांच्या हाती तलवारी

जणू चमके पिवळं पान...


माझ्या गाववेशीत भरे

मोठी बाजारपेठ...

बाजाराच्या निमित्ताने

होई साऱ्यांचीच भेट...


माझ्या गाववेशीचा स्पर्श

प्रत्येकालाच झाला...

या गाववेशीनं कधी

भेदभाव नाही केला...


गाववेशीच्या अस्तित्वात

लई दडल्या आठवणी...

किती लेकींची गं हिने

केली असेल पाठवणी...


माझ्या गाववेशीजवळ

सिद्धीविनायक वसे...

रात दिसाला जणू

त्याची साक्ष तिथं भासे...


माझ्या गाववेशीला 

दुनियादारीची कमानं...

त्यात डोकावतो माझा

पिंपळगावचा अभिमान...



Rate this content
Log in