STORYMIRROR

sarala deshmana

Tragedy

3  

sarala deshmana

Tragedy

रसायन...

रसायन...

1 min
199

रसायनाच्या गर्तेत 

सापडली वसुंधरा

कधी मोकळा निघेल तिचा

आता तरी श्वास खरा...

रसायनाच्या पाण्याने

भरले  तिचे उदक सारे

कोणीतरी तिजला यातून

मोकळे करा रे...

असह्य प्रसव वेदना

ती सोसत  आहे

मानवाच्या कृत्याचे 

फळ भोगत राहे...

एक दिवस जर 

कोपली ही माता

मानवा तुझा शेवट

होईलच आता...

तिच्या वेदनांची तुजला

जाणीव होऊ दे

सुखाने तिलाही रसायनमुक्त

जीवन रे जगू दे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy