STORYMIRROR

Jaising Gadekar

Tragedy

4  

Jaising Gadekar

Tragedy

जात

जात

1 min
26.4K


सांगू कशी कुणाला मी आज जात माझी

प्रेमास प्रेम द्यावे ही रीतभात माझी


हा आळवी भुपाळी, तो सजवितो कवाली

दोन्ही सुरात होते पावन प्रभात माझी


मी देव पाहिला त्या वस्तीत गांजल्यांच्या

मी प्रार्थना म्हणालो त्यांच्या सुरात माझी


मज सोबतीस होते ते सूर्य चंद्र तारे

वाऱ्यावरी निघाली जेंव्हा वरात माझी


आशेस लावूनिया येणे तुझे न झाले

गेली सुनी सुनी गे मग चांदरात माझी


लिहिले अभंग त्यांनी उध्दारण्या जगाला

कविता विकून येथे जगते जमात माझी


तुझियाच अंतरी दे, आता मला विसावा

ध्रुवापरी नको रे जागा नभात माझी


नाही कधीच आले जे वास्तवात माझ्या

ते स्वप्न शोधताना गेली हयात माझी


भगवी निळी कधी तर हिरवी कभिन्न काळी

वस्तीनुसार कैसी बदलेल कात माझी?


आता कलेवराला शृंगारता कशाला?

ही जिंदगी तशीही गेली फुकात माझी


Rate this content
Log in

More marathi poem from Jaising Gadekar

Similar marathi poem from Tragedy