मायबोली
मायबोली
जशी जन्मभूमी
आम्हासी पवित्र
तसे पुण्यक्षेत्र
मायबोली!
जसा वाढविला
यशोदेने कान्हा
तसा मज पान्हा
मराठीचा!
तुला ऐकताना
काळजाला हर्ष
अमृताचा स्पर्श
ओठी तुझा!
नाही म्हणो तुला
कुणी अभिजात
तुझा आई हात
हाती माझ्या!
