Meenakshi Kilawat

Tragedy

3.3  

Meenakshi Kilawat

Tragedy

कविता

कविता

1 min
579


 माझ्या महाराष्ट्राची व्यथा

मी म्हणते कशी सांगायची

आपलेच दात आपलेच ओठ

व्यथा असंख्य आहे महाराष्ट्राची.......


कशी होती अन् कशी झाली

बघावे वाटत नाही जर्जर काया

गरिबीन अन् महागाईने मांडला

दुनिया भऱ्याचा इथे पसाराय.....


नौकरी सरकारी स्वप्नातच दिसते

पदरी पडतेय आत्महत्या व खस्ता 

जोतो धरपडत आहे चार पैसे कमवण्या

लेकुरवाळी माझ्या महाराष्ट्राची व्यथा....


कुठे वृक्षाची कमी कुठे पाणी नाही

अशी दैन्य अवस्था महाराष्ट्राची बघतोय

मातेला सकस आहार ही नशिबी नाही 

किती लहान लेकर कुपोषणी मरताय.......


लोकसंख्या वाढली सारीकडे

मरना नंतर जाळायला स्मशानात

जागा सापडत नाही म्हणुन 

शवाला मशिनमध्येच जाळतात.......


अंधश्रद्धेत गुफटली जनता इथे

कळसावर कळस रचून बांधती मंदिरे

लढून झगडून चेंगरून मरती लोके

मंदिर-मश्जित मध्ये गुंजतात नारे.....


जिकडे-तिकडे कचऱ्याचे ढीग

पॉलीथिन जसे हवेत उडतात

पॉलीथिनमधले भरलेले खाद्यपदार्थ

भूकेजलेले मोकळे गुरेढोरे खातात......


सुरक्षितेची कुणी देत नाही हमी इथे

बाई बापडीला जबरदस्तीने करिती भ्रष्ट

माजले आहे इथे गुंड, मवाली,वेडे

जबरदस्तीची व्यथा भोगे माझा महाराष्ट्र...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy