ग़ज़ल अजुन लाव्ह्यासारखी
ग़ज़ल अजुन लाव्ह्यासारखी
गझल वृत्त -- देवप्रिया/कालगंगा :
अजुन लाव्ह्यासारखी
तापते आहे जखम ती अजुन लाव्ह्यासारखी
टोचते आहे व्यथा ही अजुन भाल्यासारखी...!!
थांबवावे मी कुणाला सांग आता हेरुनी
वादळाला हरवले मी गार पाण्यासारखी....!!
काळजावर घाव घेऊनी निघाली एकटी
सोबतीला गझल आली गाढ मित्रासारखी....!!
संपली होती इच्छा माझी सदाला अंतरी
ठेवली जवळी व्यथा मग धीट वाऱ्यासारखी....!!
मोगऱ्याचा माळला हा कुंतली गजरा पुन्हा
भावणारा वाहतो हा गंध वाळ्यासारखा....!!
राबूनी हा शेतमाळी जो जगाला पोसतो
मात्र त्याचे विश्व ही नाठाळ ताडासारखे...!!
पाहिले होते मनाशी जागुनी स्वप्ने इथे
कैक आशा भेटल्या होत्याच वणव्यासारख्या...!!
कोंडलेले श्वास माझे मुक्त करण्या जागले
आज होती काजव्याची झाक तार्यासारखी....!
मीनाक्षी किलावत (अनुभूति)वणी

