STORYMIRROR

Devendra Ambekar

Romance

3  

Devendra Ambekar

Romance

सूर नवा छेडलास तू

सूर नवा छेडलास तू

1 min
250

तू जिथे मी तिथे

रमते आता

वेड्यापरी सव

आनंदाचे रंग उधळूनी

सूर नवा छेडलास तू


कधी काळजाचा

ठोका होऊनी

हृदयात माझ्या

बसलास तू

आपुलकीचा गारवा 

देऊनी मज

सूर नवा छेडलास तू


स्पर्श भासतो 

तुझा सतत मज

शब्द तुझे कानी

ओघळतात

तुझ्या मायेचा सुगंध पसरूनी

सूर प्रेमाचा छेडलास तू


हे मोलाचे अतूट नाते

कधीच तुटणार नाही

घेऊन आण अशी

बेरंग माझ्या आयुष्यात

प्रेमाचा रंग नवा भरलास तू

सूर नवा छेडलास तू

सूर नवा छेडलास तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance