राखीचा सण
राखीचा सण
सण आला राखीचा
घेऊन सोबत बहिणीच प्रेम
राखी बांधली मनगटी आन
भावना उफाळून येती मनाशी
राखी फक्त एक धागा नसून
असते ते अमूल्य बंधन
मीच तुझा पाठीराखा,रक्षणकर्ता
याचे असते ते वचन
ओवाळणी म्हणून भाऊराया
टाक तुझी अपूर्ण स्वप्ने
ती पूर्ण करण्याचा आशीर्वाद भेटेल
तेव्हाच या सणाचे अप्रूप वाटेल
हा सण आणतो नवा उत्साह
नवा आनंद आणि सोबतीला
अतूट नातं टिकवण्याचा विश्वास
या दिवसाचा गोडवा आपल्या
आयुष्यात मिसळू दे
अन पुढच्या जन्मी सुद्धा
तुझ्या सारखी नाही तर तुझीच
साथ मला मिळू दे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा