STORYMIRROR

Devendra Ambekar

Romance

3  

Devendra Ambekar

Romance

राधा स्वप्नातली

राधा स्वप्नातली

1 min
341

तू तिथे मी इथे तरी

असतेस जवळी माझ्या

नाद पिरतीचा तुझा

गुंजतो चोहीकडे सारा,


कृष्ण होऊन वाजवी

पावा करतो तुझा धावा

तरीही मिळत नाही 

हृदयास माझ्या संथता,


जन्म तुझा व्हावा जणू

सोनेरी दिवसाची पहाट

गंध तुझ्या सुंदरतेचा त्यात

पसरू दे हास्याची लाट,


आठवणीत सदा जपतो

क्षण घालवलेले सोबतचे

डोळ्यामध्ये स्वरूप तुझे

आनंद साकारते नवे,


सात जन्माची लाभली 

नाही साथ जरी तरी

असशील सोबत माझ्या

बनून राधा स्वप्नातली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance