STORYMIRROR

Devendra Ambekar

Inspirational

3  

Devendra Ambekar

Inspirational

जेव्हा मेघ बरसतो...

जेव्हा मेघ बरसतो...

1 min
202

दुःख पाहता धरणीचे

उर दाटला मेघांचा,

श्रुष्टी झाली हिरवीगार

मिळाला गारव्याचा भार...


डोळ्यामधले अश्रू मिसळले

भान हरपले हृदयाचे,

आनंदाचा लयलूट झाला

क्षणात सुख अनुभवले...


हिरमुसलेल्या त्या चेहऱ्याला

भावनेचा ओलावा मिळाला,

कसनाऱ्या च्या झोळीमध्ये

कणसाचा तो मेघ बरसला...


गुडघ्याभर चिखलात मांडी

खेळ तान्ही गोंडस लेकरे,

तर दीन जीवास प्याया

ठेवी पावसात गाडगे मडके...


कधी अचानक घेऊन येतो

पूर क्रोधाचा सजीवावर,

कंठ दाटून येतो पाहून

श्रुष्टीचा झालेला पसारा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational