★जेव्हा मेघ बरसतो★
★जेव्हा मेघ बरसतो★
1 min
30
दुःख पाहता धरणीचे
उर दाटला मेघांचा
श्रुष्टी झाली हिरवीगार
मिळाला गारव्याचा भार
डोळ्यामधले अश्रू मिसळले
भान हरपले हृदयाचे
आनंदाचा लयलूट झाला
क्षणात सुख अनुभवले
हिरमुसलेल्या त्या चेहऱ्याला
भावनेचा ओलावा मिळाला
कसनाऱ्या च्या झोळीमध्ये
कणसाचा तो मेघ बरसला
गुडघ्याभर चिखलात मांडी
खेळ तान्ही गोंडस लेकरे
तर दीन जीवास प्याया
ठेवी पावसात गाडगे मडके
कधी अचानक घेऊन येतो
पूर क्रोधाचा सजीवावर
कंठ दाटून येतो पाहून
श्रुष्टीचा झालेला पसारा
