प्रेमपत्र...
प्रेमपत्र...
विचार केला आज काही
तरी वेगळं लिहून पाहूया,
हृदयातील बंदिस्त भावनांना
आज वाट मोकळी करून देऊया,
रोजचेच ते विषय घेऊन
शाब्दिक खेळ खूप खेळलो,
काव्य रचनेच्या नादात
स्वतःत इतका विरघळलो,
आज म्हटलं तिच्यासाठी
थोडी शब्दसुमने वाहुया,
खोल जिव्हाळी लागेल
असे प्रेमपत्र लिहुया,
सुरुवात केली लिहायला
पण काय लिहू सुचत नव्हतं
वाढते ठोके हेलावणारे मन
डोळा वाहणारे पाणी होतं
बांध शब्दांचा फुटेना
साथ तिची काही केल्या सुटेना,
लिहिता लिहिता शाई पसरली
लेखणी ही हवी तशी वळेना,
आता मात्र वेग मंदावला
मिटल्या डोळ्यांनी सुखावला,
वेड्या प्रेमाला कसली रचना
म्हणून लिहिलेला मजकूर नष्ट केला,
केलंत कोणावर प्रेम जरी
तर कागदापूरते मर्यादित नको,
कारण निसर्गाचा नियम आहे
कागद हा जमिनीत कुजतो