STORYMIRROR

Devendra Ambekar

Romance

3  

Devendra Ambekar

Romance

मज वेड लागले...

मज वेड लागले...

1 min
22

विस्तृत हे असे हृदयात माझ्या

जाळे बंधनांचे मज वेड लागले

तुला पाहण्याचे,


स्वतःमध्ये आनंद माझा उपभोगतो मी

दुःखाला बांधून पुरचुंडीत टाकतो मी

करतो मी बहाणे सोबत तुझ्या राहण्याचे

मज वेड लागले

तुला पाहण्याचे,


शब्दांच्या गर्दीमध्ये हरवून बसलोय मी

अंधारमय जगात प्रकाशाची वाट

शोधतोय मी छंद मज लागला

शब्द लयबद्ध करण्याचे

मज वेड लागले

तुला पाहण्याचे,


तुझ्या आठवणीत येतात अश्रू

नयनी माझ्या पण रोखून धरतो

मी त्यास कारण भीती वाटते तुझ्या

आठवणीत घालवलेले क्षण अश्रूत 

वाहून जाण्याचे 

मज वेड लागले

तुला पाहण्याचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance