पितृत्व
पितृत्व


उंबरठा ओलांडून जाता
हाक येई कानी ज्याची
मग होती अश्रू अनावर
वळून घेई गोड मिठी
तसाच काही काळ
जात मी मागे थबकले
अन अचानक माझे
बालपण जागे झाले
तुरुतुरु चालणारी पावले
सावरत घेत मज कवेत
तेव्हा मज वाटे मी
फिरते मोकळ्या आकाशात
सर करूनी दुःखाचे डोंगर
येत असत जेव्हा घरला
थकव्याचा लवलेश नसे
पण हर्ष दिसे त्या चेहऱ्याला
लाडाचा अनावर पूर असे
जरी डोकी विचारांचा गुंता
जगण्याला अर्थ असावा
त्यांच कुटुंबात असता
पण आज समजलं दूर जाता
हा असतो किती हळवा देव
बाह्य कठोर अंतरी प्रेमळ
असं कसं बनवतो पितृत्व...