डोक्याचा सायरन
डोक्याचा सायरन


वाजला आता वाजला आता
डोक्याचा सायरन वाजला आता
सुखापेक्षा दुःखाचा दर वाढला
वाढून वाढुन माझ्याच नशिबी आला,
काय बोलू कसा बोलू कळत
नकळत माझीच होते गोची
नकोसं वाटतं आयुष्य जगणं
सहन होत नाय कटकट रोजची,
अविश्वासाचा भोंगा सतत
कानात गुंजत असतो माझ्या
रागावर ताबा सुटून मग
मस्तकात होतो गाजावाजा,
आस्तित्वाची माझ्या खिल्ली
उडवत माझाच नेहमी अपमान
स्वप्नांना तर किंमत नाहीच पण
काडीचा नाही इथे सन्मान,
सगळ्यांना वाटतं माझंच चुकतं
मीच आवाज चढवतो जास्त
दुसऱ्यांच सतत ऐकून घेऊन
मीच स्वतःला केलंय नष्ट,
स्वतःच दुःख सांगून सांगून
म्हटल आता स्वतःला सांगतो
तिथे ही संपर्क साधायला गेलो
तर तिथेही नंबर व्यस्त लागतो.