तू मुकाट जा सोडून...
तू मुकाट जा सोडून...


तू मुकाट जा सोडून मला,
काहीच फरक पडणार नाही।।धृ।।
तुझे ते भेटीचे दिवस मी
केव्हाचेच विसरून गेलो।
पण तुझ्यावर मी केलेला खर्च
कधीच विसरणार नाही।।
अनेक रडत असतील
त्याला ती सोडून गेल्यावर।
काळीज वज्राचं केलं आता
तुझ्यासाठी रडणार नाही।।
जो तो मरण्याच्या गोष्टी करत होता
म्हणून थोडा मीही प्रयत्न केला।
पण, चुकलो तुझ्यावर मी मरून
आता चुकून कुणावर मरणार नाही।।
आधी तुझ्या मोहक दर्शनाने
रोज दिवस काढत होतो।
आता न
कळतही तुझ्याकडे
मी वळून बघणार नाही ।।
मला एक शंकाच होती
तुझ्या रोजच्या वागण्यावर।
पण आज मला सारं कळलं
आता शंकाच उरली नाही।।
कित्येक जण छळत असतील
सोडून ती गेल्यावर।
आपलं आयुष्य जग सुखात
तुला कधीच छळणार नाही।।
एकदाच प्रेम करावं म्हणून
मी तुझ्यावर केलं होतं।
पण, मी केलेलं खरं प्रेम
तुला कधीच कळलं नाही।।
आता फक्त उरल्या साऱ्या
तुझ्या त्या आठवणी।
तू चिंता करू नकोस
त्याही आठवणार नाही।।