Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Raj Jambhulkar

Tragedy

3  

Raj Jambhulkar

Tragedy

गण्या..

गण्या..

1 min
11.6K


गण्या माझा बालपणी पासुन चा मित्र होता 

तसं असून गण्या, माझ्याच वर्गात शिकत होता ।।


गण्याच्या पॅन्टला मागे, रोजच ठिगळ दिसत होती।

दुसरा पॅन्ट घ्यावा एवढी ऐपत , गण्याच्या बापाची नव्हती ।।


तरी गण्या कधीच कोणासमोर लाजत नव्हता ।

दरवर्षी अभ्यास करून, वर्गात पहिला येत होता ।


बाप होता गरीब तरी , त्यानं पैशाचा जुगाळ केला।

गण्याला इंजिनिअरिंगला ,प्रवेश मिळवून दिला ।।


गण्या चांगल्या मार्काने , इंजिनिअरिंग पास झाला ।

लगेच विदेशातून त्याला , नौकरीचा कॉल आला ।।


मायबापाचा विचार न करता , गण्या विदेशी निघून गेला ।

त्याच दिवशी समाजाच्या नाही , गण्या माझ्या नजरेत मेला ।।


गण्या फोन करेल म्हणून, बाप रोजच वाट बघत होता ।

बापाला फोन करायला, गाण्याला वेळचं मिळत नव्हता ।।


बापाच्या पुण्याईला विसरणारी औलाद, मला गाण्यात दिसत होती ।

अरे , त्याच बापाने गाण्यासाठी, दिवसाची रात्र केली होती ।।


गण्या पास झाल्यावर मायेनं , बायकांना वाटली होती साखर ।

आज त्यांच्याच ताटात नव्हती, चतकोर सुद्धा शिळी भाकर ।।


गण्याच्या घरी गेलो आणि, गाण्याला मी फोन केला ।

गाण्यानं एक -दोन नाही, चौथ्या वेळेस फोन उचलला ।।


बापाचं नाव घेताच गण्या, नको देऊ व्यस्त आहो मनला ।

लगेच घरात जाऊन बापानं , जहर पिऊन निरोप घेतला ।।


पोरगा बोलत नाही हा दुःख, त्याला सहन झाला नसावा ।

सांगा, त्या अडाणी बापानं, कोणता पाप केला असावा ।।


नवऱ्यावाचून जीवन नको म्हणून, मायेनं प्राण सोडला होता ।

मी गण्याला फोन लावत होतो , गण्या व्यस्तच दाखवत होता ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy