फितूर ईश्क
फितूर ईश्क
1 min
288
तुझ्या फितुर इश्कात पुन्हा जगणे नाही
तुझ्या नयन वणव्यात पुन्हा जळणे नाही
आजकाल प्रेम करणं सोपंय म्हणुनी
तुझ्या प्रेमात आता पुन्हा पडणे नाही
तुझ्या प्रेमात बेमीसाल मजनू होतो
वेडे हेच तर तुला पुन्हा कळणे नाही
आम्ही नव्या पिढीचे बिनदास्त मजनू
तुझ्या पाठीमागे पुन्हा फिरणे नाही
रडलो असलो मायेच्या पदरात जरी
तुझ्यासाठी गे माझं पुन्हा रडणे नाही
बदललोय मी या निसर्गासारखा
तुझं माझं आता पुन्हा जुळणे नाही
शासनासारखी आश्वासने दिलीस तू
आता तुझ्या जाळ्यात पुन्हा फसने नाही
