STORYMIRROR

Jayram More

Tragedy

5  

Jayram More

Tragedy

इथे मी नव्याने

इथे मी नव्याने

1 min
1.3K

पुन्हा त्याच जखमा पुन्हा तेच गाणे

कसे स्वप्न पाहू इथे मी नव्याने


तिच्या काळजाला मिळावा दिलासा 

असे गात गेलो सदा मी तराणे


नकोसा तिला वाटतो पावसाळा 

तिचा घात केला म्हणे त्या ढगाने     


सुना राहिला पापणीचा किनारा

जखम काळजाला दिल्यावर सख्याने


तिला वाटते का जखम ती सुगंधी

कसे सोसते हे तिचे तीच जाणे


जरी राबतो बाप माझा निरंतर

तरी राहिला ना कधी तो सुखाने


कशा अंतरी बोचती यार जखमा

रिते राहिले ना जराही रकाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy