सबला हो
सबला हो
हल्ली चीर निद्रेत गेलीय
तुझ्यातली दुर्गा लक्ष्मी अहिल्या
म्हणूनच जागोजागी माजलेत वासनांधासूर
तुझ्या अब्रूचे स्वाहाकार
करण्यासाठी
समाज
तुझ्यासाठी काढतोय फक्त
निषेध मोर्चे आणि कॅन्डल मार्च
तुझ्या प्रती खोटी सहानूभुती दाखवण्यासाठी
खरं तर
त्या गर्दीत ही असतात
तुला भोगवस्तू समजत
पिढ्यांची निर्मिती करणारे
यंत्र मानणारे...
कुठवर
सहन करत राहशिल तू हा अन्याय
किती पाहशिल यांच्या
वासनेची कुस वांझ
होण्याची
वाट...?
हायब्रिड अन्न खावून
मरणासन्न झालीय यांच्यातली शालिनता
वळवळत आहेत वासनेचे विषाणू
मेंदूत
म्हणून म्हणतोय
तुला स्वयंसिध्दा व्हावचं लागेल
स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची अब्रू
या विकृत समाजा पासून
शाबूत ठेवण्यासाठी