नजर
नजर
1 min
415
पुरुष प्रधान
संस्कृतीच्या चष्म्यातून
जेव्हा तुम्ही पाहता तिच्याकडे
तेव्हा तुमच्या मनात विकृती आणि
वासनेची विषवल्ली फोफावू लागतेय जोमाने
पौगांडावस्थेत तिच्या होणारे बदल पाहून
तुमच्यातलं पुरुषत्व जागतं नको त्या विचारांनी
तेव्हा तुम्हाला ज्ञात असणारी सर्वच नाती
तुमच्या विस्मरणात जातात आणि
मनात खवळून उठतात
अविचारांच्या लाटा
तिला ध्वस्त
करण्यासाठी
आपल्या भाषणातून
विवेकानंदाचे उदाहरणे देतांनाही
जेव्हा तुम्ही समोर बसलेल्या तिच्याकडे
विशिष्ट नजरेने जेव्हा कटाक्ष टाकतात तेव्हा
तुमचा बेगडीपणा सहज लक्षात येतो तिच्या
अन् ती तिची घसरलेली ओढणी ओढून घेते
परोधरावर पुन्हा पुन्हा