STORYMIRROR

Jayram More

Others

3  

Jayram More

Others

गझल

गझल

1 min
159

चल दुःखांना, आपण स्मरू 

अन् जखमांशी, सलगी करू


आनंदाने जगलो अता 

डोळ्यांमध्ये ,अश्रू धरू


आहे सत्ता, हातात तर

घोटाळ्याच्या कुरणी चरू


जातियतेने, रण तापले

बंधूत्वाचे लावू तरू


लैला मजनू ,झाले जुने

त्यांच्या रंगी आपण भरू


Rate this content
Log in