STORYMIRROR

Jayram More

Inspirational

3  

Jayram More

Inspirational

पसरत जाते

पसरत जाते

1 min
131

दाट धूके आठवांचे जेव्हा मनात पसरत जाते

गतकाळाचे चित्र डोळ्यासमोरुन सरकत जाते


संशयाचे भुत जर का बसले मानगुटीवरती

संसाराच्या तव्यावरची भाकरी चटकत जाते


सट्टा मटका जुगार दारु व्यसन जडल्यावरती

गोकूळ नांदत्या घरदाराची मग बरकत जाते


 कर्ता बाप मेल्यावरती माय एकटी पडते अन्

 हिस्स्यावरुन भावा भावामध्ये खटकत जाते


मृग बरसतो शेत शिवारी भिजते काळी माती

आनंदाने लावणीसाठी नार बळीची मटकत जाते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational