STORYMIRROR

Jayram More

Others

4  

Jayram More

Others

गझल

गझल

1 min
444

मनाची मनाशी दरी फार आहे

तिला सांधणारी कुठे तार आहे 


स्मरू का? पुन्हा मी तिच्या आठवांना!

तिचे प्रेम नुस्ताच व्यापार आहे


पुन्हा मांडला डाव मी ही नव्याने

जरी घाव हृदयास अलवार आहे


रुजामे फुलांचे उचल फेक मित्रा

समाधीस माझ्या उगा भार आहे


विसरलो स्वतःला तिला पाहिल्यावर 

मना वेधणारा तिचा वार आहे


अरे..! रक्त माझे तुझे सारखे तर

उभी राहिली का हि दीवार आहे


जगी एकट्याने जरी भांडलो मी

मला चांगले भाग्य मिळणार आहे


Rate this content
Log in