STORYMIRROR

Jayram More

Tragedy Others

3  

Jayram More

Tragedy Others

किन्नर आहे ती

किन्नर आहे ती

1 min
193

ऋतू ऋतूनीं बहरत जाते पण,

 ऋतु प्राप्तिचे वरदान लाभलेच नाही 

स्त्री असूनही अपूर्णत्वात जगतेय ती,

सौदर्याची खाण असूनही,

शापित आहे ती.. .... 


पुर्वजन्माचे पाप म्हणू की कोप निसर्गाचा

 जे भोग या जन्मी भोगतेय ती

हृदय भरले ओतप्रोत ममत्वाने 

मातृत्वापासून तरीही 

दूर आहे ती


शून्यात निघते उत्तर

तिच्या आयुष्याच्या बेरजेचे

बाई असूनही बाईपणात कुठे मोडते ती 

चार चौघात वावरतांना 

कित्येक दुःखे अंतरी 

सोसते ती


कुत्सित हसणे..,

कुत्सित टोमणे..., 

नकोसे होते तिला हे जगणे

छळणाऱ्यांच्या वणव्यामधून

वाट निमूट चालते ती


रुढी परंपरांना चिटकलेल्या

नर नारी अन समाजामध्ये

स्थान आपले शोधते ती 

किन्नर आहे ती...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy