STORYMIRROR

Jayram More

Others

3  

Jayram More

Others

घडून गेले

घडून गेले

1 min
125

बरेच काही येथे घडून गेले

स्वप्न कोवळे पुन्हा करपून गेले


गाव तिलाही परका झाला होता

पापणित तिच्या तसे दिसून गेले


खिळे ठोकले हृदयावरती मी अन्

तिचे स्वप्नात छळणे टळून गेले


हृदयामधली जखम प्रसवली जेव्हा

डोळ्यात तुझ्या भाव उमटून गेले


कसे समजते दुःख मनाचे तुजला

जयरामाला कोडे पडून गेले


Rate this content
Log in