STORYMIRROR

Jayram More

Tragedy Classics

4  

Jayram More

Tragedy Classics

कोप प्रकोप

कोप प्रकोप

1 min
432

हल्ली 

येत नाही ढगांना

खळखळून हसायला

भुई आतुरलीय थेंब टपोरे मिठीत घ्यायला


रोजचं होतं पोटूशी आभाळ

प्रसवपिडा ही ऐकू येते त्याची

पण प्रसवण्याआधीच पडतो दुपाव

उनाड वाऱ्याच्या 

आघाताने


मग

पाण्यानं भारलेले ढग

पसार होतात गावच्या वेशी मधून

 दिवसभरासाठी 

येणाऱ्या दिवसांकडे

 बोट दाखवून


निसर्गाच्या 

या पोरखेळानं 

बापाच्या चेहऱ्यावर आलेलं

चिंतेचं सावट स्पष्टपणे जाणवतं

त्याच्या कपाळाला पडलेल्या आठ्यांमधून 


 अचानक बांधावर आलेल्या सावकाराला पाहून

 उगीचच घालमेल होते मग त्याच्या जीवाची

 अन् त्याची भिरभिरणारी नजर जाते

 येड्या बाभळीच्या झाडाला टांगलेल्या

 एन्ड्रीन च्या डब्याकडे....!


पण...

त्याच क्षणी आठवतो त्याला 

माझा निरागस चेहरा आणि

 दररोज सकाळ संध्याकाळ

मणी मंगळसुत्राला डोळ्यांना व

मस्तकाला लावून देवाला

प्रार्थनारी माझी माय...!!


अन् मुसळधार बरसून जातात 

त्याच्या पापणीत दाटलेलेले ढग...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy