STORYMIRROR

Ramesh Sawant

Tragedy

4  

Ramesh Sawant

Tragedy

गावगाडा

गावगाडा

1 min
27.5K


बरीच पडझड झालीय म्हणतात

गावकुसाबाहेर सडत पडलेल्या मठीची

जिथं कधीतरी फक्त पारवेच फडफडून येतात

अन बसतात तिथं घटकाभर संसदेत बसल्यासारखे 

मग एखादा क्रांतिवीर पारवा चित्कारतो तेव्हा

भंग होते तिथली शांती काहीकाळ

अन सगळेच कसे एकापाठोपाठ एक

उडून जातात भुर्रकन दुसऱ्या जागेच्या दिशेने

तेव्हा गावातली काही उनाड पोरं

किलकिलाट करीत घुसतात तिथं

आपल्या मस्तीचे भान विसरून

पण या उद्ध्वस्त मठीच्या बगलेत मात्र

दारिद्र्याची धूळ लेवून वाट पाहत

चिरकाळ निपचित पडलेली गावकूस 

या भीतीने खिळखिळी झाली आहे की

गावगाड्याच्या भिंतीना

बाजारू शहरांच्या आक्रमणाची वाळवी लागून

त्या कधीही जमीनदोस्त होतील


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy