आठवणींचा प्रलय
आठवणींचा प्रलय


अश्रू माझ्या मरणावर तुम्ही गाळू नका
मी मेलो त्याचे सूतकही तुम्ही पाळू नका
जन्मभर निराधार ठेवले मला तुम्ही
मांडी देवून चेहरा माझा न्याहाळू नका
जीवनात होता माझ्या अंधार दाटलेला
दिपकही मरणावर तुम्ही जाळू नका
शुलांनी वेढलेले वादळी जीवन माझे
फुले टाकून पार्थीवावर ते चाळू नका
निंदा केली जीवनभर माझ्या विचारांची
स्तुती करून ह्या मृतदेहाला छळू नका
मी मेलो तरी विचार अमर राहतील
पटणार नाही तुम्हा त्यांना उजाळू नका
भावपूर्ण आठवणींचा प्रलय येईल
तेव्हा माझ्या देहाला कवटाळू नका