STORYMIRROR

Anil Date

Romance

2  

Anil Date

Romance

तू

तू

1 min
15.2K


घर करून राहिली माझ्या मनात तू

घेऊन हर्ष आली माझ्या जीवनात तू


कर लाख यत्न दृष्टीआड राहण्याचे

साकारली प्रिये कवीच्या कल्पनात तू


तुझेच प्रतिबिंब आहे स्वप्नात माझ्या

बैसली काजळापरी या नयनात तू


होतील बंद कसे हे काळजाचे ठोके

आहेस अशी ह्रदयातील स्पंदनातू तू


पाना, फुला, फळात अन् दिशादिशात

सर्वव्यापी तू सृष्टीच्या कणाकणात तू


जगाने तर केव्हाच पाठ फिरवली

ठेवलेस तेवढे मला स्मरणात तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance