जळतं मन
जळतं मन
मन अचानक उदास होतं,
काळजाचं पाणी पाणी होतं
कशातही लक्ष लागत नाही,
जीवन नकोस होतं
एकदाचं जीवन संपवून श्वास
मोकळा करावासा वाटतो
क्षणार्धात आप्त सगळे
परके वाटू लागतात
संपूर्ण जग असहाय भासू लागतं
जीवनाच्या आनंदावर विरजण पडतं
पण हे फक्त प्रेमभंग झाल्यावर होतय असं नाही
मन विद्रोह करून उठते जेव्हा
माणुसकीला गाडून त्यावर झेंडे रोवले जाते
माणुसकीच्या गर्भाला हात लावून
कोथळ्याला बाहेर काढले जाते
मनाच्या मशाली पेटून उठतात जेव्हा
निरपराध लोकांचा हकनाक बळी घेतला जाते
तळपायाची आग मस्तकात पोहचते जेव्हा
किळसवाणे अपवित्र हात
मायबहिणींच्या अब्रूची धिंड काढते
गोमांसाच्या संशयावरून जीव जाईस्तोवर
निष्पाप जीवांना मारहाण केली जाते
मन जळतं, कुढतं, सैरावैरा धावू लागतं
नरडीचा घोट घ्यावासा वाटतो त्या नराधमांचा,
जे विषमतेचे बीज पेरतात
ठेचून टाकावे वाटते त्यांना जे दंगली
घडवून आणतात
मुडदा पाडावा वाटतो त्यांचा
जे जातीच्या नावावर माणसे रीतसर वाटून घेतात
उध्वस्त क
रावीशी वाटते ती व्यवस्था
जी माणसा माणसात भेदाभेद करते
जिव्हा छाटाविशी वाटते त्यांची
जे बेंबीच्या टोकापासून समानतेचे पाराने गातात
बेछूट छाटाव्या वाटतात त्यांच्या मुंडक्या
जे गलिच्छ विचार इतरांवर थोपतात
पेटवावी शी वाटते पुन्हा क्रांतीची ज्योत
आणि तुडवावेसे वाटते त्या माणुसकीच्या
शत्रूंना हत्तीच्या पायाखाली
नायनाट करावासा वाटतो त्यांचा
जे लोकशाहीचा सर्रास रोज बलात्कार करतात
जीवाची तमा न बाळगता या रे भाबड्यांनो
दिन दुबळ्यांनो, शोषित पीडित वंचितांनो
लाल रक्ताच्या क्रांतीची वेळ आली आहे
एकत्रित येऊन राजसत्ता
बदलण्याचा काळ आला आहे
कोटी कोटी देवी देवतांच्या
श्रापातून मुक्त होण्याची वेळ आली आहे
माय धरणीला पापी कुकृत्या मधुन
सोडवण्याची वेळ आली आहे
करा मनाचा विद्रोह, करा खांडोळी खांडोळी
जे तुमच्या जगण्याचं अस्तित्व नाकारतात
झुगारून द्या ते मानेवरचे जू ,
जे तुमचे कंबरडे मोडतात
आणि मुक्ती चा श्वास घ्या मोकळा
जगा स्वच्छनंदी,उत्सव साजरे करा जीवनाचे
बळ भरा पंखात आणि उडा मनसोक्त