STORYMIRROR

Nalanda Satish

Tragedy Others

4  

Nalanda Satish

Tragedy Others

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

1 min
231

वयाची लागली साठी 

समाजा साठी झालो ज्येष्ठ नागरिक 

नोकरी मधून झाली निवृत्ती


घसरण झाली शरीराची आणि मनाची

कमी झाली क्षमता इच्छाशक्तीची

अपूर्ण इच्छा करायच्या आता पुर्ण 

देत नाही साथ कवटी दाताची 


राब राब राबलो आयुष्यभर 

पायांना पडल्या भेगाचं भेगा 

डोक्यावरचे उडाले केस

आणि चेहर्यावर पडल्या सुरकुत्या 


पार पाडल्या सर्व जबाबदार्या 

उसने नाही कुणाचे 

छंद जोपासील एखादा आवडीचा 

सोने करेल जो उर्वरित आयुष्याचे 


ओझं कुणावरही होणार नाही 

हेचं जिवनाचं सार्थक 

अंगात बळ असेल तोपर्यंत 

साधत राहिल परमार्थ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy