दुरापास्त
दुरापास्त
1 min
244
जातीव्यवस्थेची विशेषणे
जगणे करते दुरापास्त
निरपराध जीवांना
दंगली करतात फस्त
समाज व्यवस्थेची
सांगड झाली अस्त
समाज बांधणीची
काया झाली लुप्त
जनावरापेक्षा माणूस
झाला स्वस्त
गुरेढोरे रस्त्यावर
मायबाप आश्वस्त
जनता झेंडे घेऊन
नाचण्यात व्यस्त
समाजकंटकी घेतात
त्यांचा फायदा मस्त
लोकशाही म्हणतात ज्याला
राहिली ना त्याची शिस्त
गल्ली गल्लीत घालावी
लागेल आता गस्त
कोणीच नाही कोणाचे
कोण ठेवते भिस्त
परके झाले आप्तनातेवाईक
विभक्त झाले तृप्त
दडपशाही नी जनता
झाली त्रस्त त्रस्त
बदलावा वाऱ्याचा झोत आता
हीच मागणी रास्त रास्त
