दगड
दगड
एक गोल गोल दगड घ्या
शेंदुर फासा घसाघसा
गाडा तिथे नजर सर्वांची पडेल जिथे
अगरबत्ती हळूच लावा
दोन फुलेही वाहा दगडाला
दगदासारखे डोके टेकवा
अधुनमधुन प्रसाद ही चढवा
काही काळ लोटू दया तसाच
दगदाचा हळूच देव करा
आता तुम्ही मोकळे
दगडाच्या देवाचे जागृत देवस्थान करा
महिमा मंडन सुरु करा
देवाला नवस बोला
लागल्या हाथी छोटसं मंदिर बांधा
जागा आहे मोक्याची
सोडायची नाही सहजासहजी
आता वेळ आहे लोकांच्या
धार्मिक भावना भडकविण्याची
गोळा करा निधी मंदिराच्या नावावर
महाप्रसादाचे वितरण
अखंड भजन कीर्तन
स्त्रियांना करा समोर
वरिष्ठ नागरिक कोणत्या येतील कामी
पार बां
धा आणि सुरु पहरेदारी
हिरवळ माणसांची, रहदारी भक्तांची
दुकानांची रांग लावा
धर्म आहे अफुची गोळी
कार्ल मार्स्क ला सत्यवचनी ठरवा
अशीच चालु दया आरती निरंतर
अंगवळनी पडले सगळे की
उभारा मोठे मंदिर,करा कमेटी गठित
अधिष्ठान करा, अभिषेक करा
आलेले दान रितसर वाटून घ्या
झोपड्यांचे इमारती मध्ये रूपांतर करा
एका दगड़ाने जीवनाचे कसे
परिवर्तन केले, विचार करा
दगडाची किमया अपरंपार
म्हणुन कुकुरमुत्त्या सारखे
दगड गाडतात जागोजागी
बाजार मांडला देवाचा ठायीठायी
काही लोकांचा रोजगार आहे
भावनांचा मांडला बाजार आहे
अंधश्रद्धेला उकळत उफान आहे
गरीब जनतेला खायीत ढकेलन्याचे प्रमाण आहे.